शिरोळ श्री दत्त पॉलिटेक्निकच्या ७ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड....चेअरमन गणपतराव पाटील यांची माहिती


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील ७  विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूवच्या माध्यमातून *टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड* या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यांना वार्षिक ३ लाख २५ हजारांचे पॅकेज मिळाले आहे.

    संस्थेचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील याबाबत माहिती देताना म्हणाले, दत्तमधील विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली असून कॉलेजने विद्यार्थ्यांना राज्य, देश व विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे  विद्यार्थी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. ७ विद्यार्थ्यांची  *टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड* या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेली निवड कॉलेजसाठी अभिमानास्पद आहे. वरील कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यामध्ये मेकॅनिकल विभागांमधील ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यावर्षी कॅम्पस सिलेक्शनमध्ये कॉलेजने मोठे यश संपादन केले आहे. नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजेनुसार लागणारे सॉफ्ट स्किल, अप्टीट्युड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यूव, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचे प्रशिक्षण तसेच अनेक उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. ओंकार पाटील, हर्षद पाटील, प्रतिक चौगुले, अमेय जगताप, सागर थोरात, सबा शेख आणि श्रेयस मगदूम या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुविधा केंद्र कॉलेज मध्ये सुरु झाले असून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष  विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधावा. विद्यार्थी स्वत: अथवा सुविधा केंद्रावर आपला प्रवेश अर्ज भरु शकतो. तसेच कागदपत्रांची छाननीही करु शकतो. अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत  ३० जूनपर्यंत आहे. त्यानंतर ३ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. ४ ते ६ जुलै दरम्यान गुणवत्ता यादीमध्ये तक्रार करण्यास मुदत असेल.  ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होणार आहे. 

सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन व अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रास भेट देवून आपला अर्ज दाखल करण्याचे आवाहन   प्राचार्य पी. आर. पाटील व सुविधा केंद्राचे  समन्वयक  एस. एम. कुलकर्णी यांनी केले.

 यावेळी एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानिवडेकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, जे ए मुलानी, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे, मिस पी. बी.पाटील, तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post