जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर



प्रेस मीडिया लाईव्ह :

 सातारा, दि. 30 : जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील  एकूण 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले आहे. 

 कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे, मांगवाडी, आदर्शनगर, उत्तर तांबवे, कोयनावसाहत, पश्चिम उंब्रज, बेलवाडी, शितळवाडी, नाणेगांव बु. व फलटण तालुक्यातील  परहर बु. या एकूण 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

  निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दि. 22 जुलै 2022 दुपारी 3.00 वा. नंतर.  मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.


Post a Comment

Previous Post Next Post