ग्रामीण रुग्णालय काशीळ येथे सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे 2 जून रोजी आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा,दि.1 : ग्रामीण रुग्णालय, काशीळ या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे 2 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, काशीळ व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post