जिल्हा परिषद व पंचायत समिती सन 2022 चा प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

हरकती 8 जूनपर्यंत लेखी स्वरुपात नोंदवाव्यात..

प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा,दि.1 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 10 मे 2022 अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना सन 2022 चा प्रारुप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  यानुसार प्रभागरचना सन 2022  दि. 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग रचेनवर 2 जून ते 8 जून 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत हरकती घेण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण प्रारुप प्रगारचनेवर हरकती स्विकारण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसलि कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखा येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे.  ज्यांना प्रभागरचेनवर हरकती नोंदवायच्या आहेत त्यांनी आपली हरकत संबंधित तहसिल कार्यालयाच्या हरकती कक्षामध्ये आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रांसह लेखी स्वरुपात नोंदवावी.

प्राप्त हरकती व सुचनांवरील सुनावणी विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांच्यासमोर विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे येथे 13 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post