प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
मोहपाडा बाजारपेठेत दोन्ही बाजूला दुकाने असल्यामुळे त्याच्यासमोर प्रत्येक दुकानदाराने वाढता अतिक्रमण केला असून येणाऱ्या-जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच येणाऱ्या बाजारपेठेत नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षित असून रसायनी परिसर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या परिसरात लोकसंख्या वाढती असल्यामुळे लोकांना मुख्य बाजारपेठ मोहपाडा हा असल्यामुळे मोहपाडा आल्याशिवाय कुठली खरेदी होऊ शकत नाही पण येथे ग्रामपंचायतचे या बाजारपेठेकडे दुर्लक्ष असून रस्त्यावर ती दुकाने मांडली जातात दुकानदारांना आकारण्यात आलेले घरपट्टी त्याच्या बाहेर भागात रस्त्यावर धंदे का लावण्यात येतात ग्रुप ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी तसेच सदस्य लोक बाजारात फिरत असतात यांच्या का लक्षात येत नाही तसेच मच्छी मार्केट पासून ते नवीन पोसरी कडे जाणारा रस्ता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसत असून यामुळे ट्राफिक जाम होत रोज याचा नागरिकांना त्रास होत आहे या वरती ट्राफिक पोलीस का कारवाई करत नाही याकडे खालापुर पंचायत बीडीओ पुरी साहेब यांनी जातीने लक्ष टाकून हा प्रश्न सोडवतील असे वाटते.