रसायनी परिसरात तिचे सर्व पालक वर्गात विद्यार्थी यांनी तिचे कौतुक केले आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत कु. सिमरन समीर आंबवणे़ प्रीआ स्कुल मोहोपाडा हिने 96% गुण मिळवून सर्वाना आनंदाची बातमी दिली आहे . सिमरन लहानपणापासून शांत हसरी व मन मिळावु स्वभावाची आहे. इयत्ता 4थी आणि 8वी शिष्यवृत्ती परिक्षेत तिने यश मिळविले होते. वाचन, लेखन, खेळ. चित्रकला या सर्वामध्ये आवड असणारया सिमरनने अनेक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत.डीसेंबर 2021 झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत (महाराष्ट्र /गुजरात संयुक्त) येथे प्रथम येण्याचा मान मिळवला. जिल्हास्तरीय हाँकी स्पर्धेत प्रीआ स्कुल तर्फे प्रतिनिधित्व करताना विजेतेपद पटकावले. चिन्मया मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या आँनलाईन गीता चँंटीग स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावला.
सिमरन ही श्री साई क्लासेसचे संस्थापक श्री समीर आंबवणे सर यांची कन्या आहे. तिच्या यशामुळे रसायनी, मोहोपाडा परीसरात सर्वत्र तीचे कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी तिला फोनवरून शुभेच्छा दिल्या. आपटे सरपंच, आणी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या