दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे मंगळवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ७ पासून 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' चे आयोजन करण्यात आले आहे. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच शिक्षक वर्ग फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्याचा सराव सुरु असल्याचे 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले.
Tags
पुणे