राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान

पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय..? पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी.

अपमान कोणी व का केला एसआयटी स्थापना करून शोध घ्यावा- सचिन खरात

देहू येथील झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान यांच्या भाषणाच्या अगोदर नियमानुसारनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे हे अत्यावश्यक होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झाल्यावर साधं भाषणासाठी अजितदादा पवार यांचं नाव सुद्धा पुकारलं नाही. हा महाराष्ट्र राज्यातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. देहूमध्ये सनातनी लोकांनी तुकाराम महाराज यांना त्रास दिला होता. त्याच सनातनी वृत्तीच्या लोकांनी जाणूनबुजून अजितदादा पवार यांना भाषण करू दिले नाही, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा महाराष्ट्र राज्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे कोणी आणि का केले याचा खुलासा होण्यासाठी एसआयटी ची स्थापना करून शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे.

भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही - देहू संस्थान

या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, "हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post