वारकरी बांधवां बरोबर ईंद मिलन स्नेह मेळावा संपन्न.

 अंदाजे ५०० वारकरी बंधूंना शिरखुर्मा व खजूर वाटप करण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  २२ जून २०२२, बुधवार रोजी दारूवाला पूल येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या मैदानावर सायं ६,०० वाजता वरील मेळाव्याचे आयोजन मुस्लीम औकाफ वेलफेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री मुश्ताक पटेल व अखिल राष्ट्रीय समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हाजी इक्बाल तांबोळी, त्याच प्रमाणे श्री.समर्थ गाळे धारक संघटना यांच्या संयुक्त करण्यात आले होते.

या प्रसंगी श्री. ह.भ.प. धनवडे गुरुजी व दिंडी प्रमुख श्रीअच्युत महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी कोरोना काळात दिवंगत लोकांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळेस कार्याध्यक्ष श्री मुश्ताक पटेल यांनी देशात शांती , सदभावना, सलोखा, बंधुभाव प्रेम वाढावा यावर आपले विचार मांडले. डॉ. मिलिंद भोई व श्री. ह.भ.प. धनवड़े गुरुजी यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी होणे करिता श्री. प्रमोद बोराडे, ऑॅड, मारुफ पटेल, कासमभाई शेख, श्रीरंग हुलवडे, युसुफभाई चाविवाले, स्वप्ील शिंदे, उमेश खंडागळे, श्री ठक्कर, मंगेश हिरांवाल, श्री गायकवाड यांनी परीश्रम घेतले.

या वेळेस उपस्थित अंदाजे ५०० वारकरी बंधूंना शिरखुर्मा व खजूर  वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post