बनावट एसएमएसच्या मार्फत महावितरणाच्या ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट

प्रेस मीडिया लाईव्हचा पुणे शहरातील नागरिकांना लूट पासून सावध राहण्याचा इशारा


प्रेस मीडिया लाईव्ह

जिलानी उर्फ मुन्ना शेख

पुणे दि.१८ शहरातील विविध भागात महावितरणच्या ग्राहकांना वैयक्तिक एसएमएस पाठवून लुटण्याचा प्रकार घडत आहे.

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ' एसएमएस ' पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे . त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे . त्यामुळे कोणत्याही अशा प्रकारे वैयक्तिक येणाऱ्या एसएमएस वर पुण्यातील नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

      

  

           नागरिकांना आव्हान लक्षात ठेवा..

 महावितरण वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून SMS किंवा WhatsApp संदेश पाठवत नाही.

   आणि ' एसएमएस ' पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगत नाही •

 एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगत नाही. 

अशाप्रकारे संदेश आल्यास ग्राहकांनी cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी

किंवा  १ ९ १२ , १८००१०२३४३५ १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा , असे आवाहन महावितरणने केले आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह 

  उप संपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post