ससून रुग्णालयातील भ्रष्टाचार व धिम्म पडलेले प्रशासन

भ्रष्टाचार हाच शिष्ठाचार अश्या प्रकारे कारभार सुरु आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह

 आपल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दैनदिन उपचार व आरोग्यसेवा मिळण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात . आपली सर्व आरोग्य व्यवस्था असंवेदनशील असल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात त्याकडे गांभीर्याने पाहण्याचे धाडस आपल्या प्रशासनाकडे नाही कारण या व्यवस्थेत काम करणाऱ्या अनेकांचे हात भ्रष्टाचाराने व काम चुकारपणा करण्यातच गुंतलेले आहेत हेच खरे वास्तव समोर येत आहे . 

आपल्या रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात दरवर्षाला साधरण ७००० मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येते . या विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी व डॉक्टर यांचे भ्रष्टाचाराचे कुरण असून माणूस मृत्यू झाल्या नंतर कसे सुरू होते या बाबतच्या अनेक घटना आपणांस माहीत आहेतच मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे मृत शरीर झाकण्यासाठी १००० ते १५०० रुपयांची मागणी नातेवाईकांना केली जाते . नातेवाईक पण भावनेच्या भरात पैसे देतात याची पावती मिळत नाही परंतु हे योग्य आहे का ? हा मूळ प्रश्न उपस्थित होतो राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून ही व्यवस्था चालवतात पण मृत्यूनंतर मृतदेहाला झाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था शासन करीत नाही का ? भ्रष्टाचार हाच शिष्ठाचार अश्या प्रकारे कारभार सुरु आहे . दरवर्षी ७,००० शवविच्छेदन करताना १,००० / - रुपये प्रत्येक वेळी घेतले जातात याचा ढोबळ हिशोब केला तरी ७०,०००,०० / - रुपये अंदाजे भ्रष्टाचाराची रक्कम होते . आपल्या दुसऱ्या विभागात अपंगत्वा चे प्रमाणपत्र देणारी व्यवस्था पण भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे . अनेक गरजू अपंगांची कामे पैसे देऊनच होतात अश्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेल्या आहेत ते पण पुराव्यानिशी आम्ही सिध्द करून देऊ . आपल्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण व अवयवदान या विषयात पण माफियाराज सुरू आहे परंतु आपल्या सर्वाच्या संगनमतानेच हे सर्व सुरु असल्याने सामान्य जनतेची फसवून करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . या सर्व व्यवस्थेतील प्रशासनाच्या विरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे . सदर पत्राद्वारे आपणांस कळविण्यात येते की शवविच्छेदन विभागात कापड उपलब्ध करून देण्यात यावे जेणे करून येथील भ्रष्टाचाराला आळा बसेल तसेच अपंगत्व प्रमाणपत्र देणारा विभाग व इतर सर्व विभागातील प्रशासन , डॉक्टर , परिचारिका , सेवक या सर्वांचे रुग्णांबरोबरचे उद्घट , अरेरावीचे वर्तन तातडीने थांबवून आरोग्य सेवेतील सर्वानी संवेदनशीलतेची , माणुसकीची वर्तणूक दाखवावी अन्यथा आपल्या भ्रष्टाचारी व जुलमी प्रशासनाच्या आंदोलन करेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी . अशी घोषणा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे


प्रेस मीडिया लाईव्ह

  उप संपादक; जिलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post