आम आदमी पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने आज हे काम होत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोथरूड परिसरातील पौड रस्ता कचरा डेपो बाहेरील रोडवर कचरा ट्रक जेव्हा तिथून जात असताना कचऱ्यातील तेल गळतीमुळे रस्ता निसरडा होत असतो. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात होत असतात. गेल्यावर्षी ही बाब आम आदमी पक्षाच्या जेव्हा निदर्शनास आली तेव्हापासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, परंतु मुजोर, बेमालूम प्रशासनाने यावर गेल्यावर्षी काहीच केले नाही. या निसरड्या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच त्यामुळे आपले रोजगार देखील गमवावे लागले आहेत. परंतु यावर्षी दुर्घटनांची पुनरावृत्ती पावसाळ्यात होण्याची शक्यता असल्यामुळे आप राज्य वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी अगोदरच मनपा प्रशासनाकडे यासंबंधी पाठपुरावा सुरू केला होता. निगरगठ्ठ मनपा प्रशासन याही वेळी दाद देण्याच्या मनःस्थितीत नव्हते परंतु श्रीकांत आचार्य, सुहास पवार, ज्योती ताकवले, आरती करंजावणे या आपच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांची काल भेट घेऊन सक्त ताकीद दिली की जर या ठिकाणी कुठला अपघात झाल्यास आणि कुणाला अपंगत्व आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू अथवा कुणाचा मृत्यू झाल्यास मनपा प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. तसेच आप राज्य संघटक विजय कुंभार यांनी झोन ३ च्या डीसीपीसोबत फोनवर चर्चा केली. यानंतर प्रशासनाने जागे होत आज रस्ता स्वच्छ केला जात आहे, तसेच पुन्हा रस्ता निसरडा होऊ नये यासाठी स्क्रबर बसवण्यात येत आहे. आम आदमी पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने आज हे काम होत आहे.
"या रस्त्यावर अनेक लोकांचे गंभीर अपघात झाले होते, अगदी काल-परवा झालेल्या पावसाने अनेक दुचाकी येथे घसरल्या होत्या. प्रशासन कालसुद्धा दाद देण्याच्या मनःस्थितीत नव्हते परंतु आम्ही संयम न सोडता भेट न देऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे नाईलाजाने फेसबुक लाईव्ह देखील केले. मात्र सरतेशेवटी प्रशासनाने नमते घेत आज अपघात होऊ यासाठीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.", श्रीकांत आचार्य, आप वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष"प्रशासन दाद देत नसताना देखील आप कार्यकर्त्यांनी संयम न सोडता विषयाचा पाठपुरावा कायम ठेवला. शेवटी आप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांस यश मिळाले. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम आदमी पक्ष कायम कटिबद्ध आहे.", विजय कुंभार, आप राज्य संघटकआपचे किरण कांबळे, फेबिनो, अनिल कोंढाळकर, पियुष हिंगणे, निसार सय्यद देखील यावेळी उपस्थित होते.