५०० ‘सचित्र बालमित्र' उजळणी पुस्तकांचे मोफत वाटप...!
प्रेस मीडिया लाईव्ह :
'लेखन-वाचन अभियान'
इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी अक्षरे लिहिता वाचता यावीत, अंकअक्षर ओळख सुलभ व्हावी साठी 'सचित्र बालमित्र' हे उजळणी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. मात्र पालकांच्या आर्थिक अडचणीमुळे सर्वच पालक हे पुस्तक खरेदी करू शकत नाहीत, म्हणून राज्यात लेखन-वाचन अभियान राबविणाऱ्या पुण्याच्या उदयकाळ फाउंडेशन संस्थेकडून हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उजळणी पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी आज दिनांक २२ जून २०२२ रोजी सचित्र बालमित्र उजळणी पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.
"शाळेत प्रथमच दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत अक्षर व अंक ओळख करून देणारे हे पुस्तक असून, चित्राच्या सहाय्याने आकलन क्षमता बळकट होण्यास मदत करते. हे पुस्तक बाजारात स्वस्त किमतीत उपलब्ध असले तरी प्रत्येक गरीब पालक खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी सोप्या पुस्तकापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांत सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक मोफत मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यास फायदा होणार आहे." असे शाळेतील मुख्यध्यापक माननीय श्री. सुरेश कटके म्हणाले.
या उपक्रमाद्वारे केसनंद गावातील १५० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.या मुलांना मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, अंकअक्षर ओळख व्हावी हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे" असे उदयकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. उदयकाळ फाउंडेशनचे प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली.