७७ वर्षाच्या पीडित आजोबांना " अपना वतन " ने दिला आधार.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे : मार्च महिन्यामध्ये मी माझ्या ऑफिसवर होतो , जवळपास ७ च्या आसपास मला एक फोन आला .*मी खत्री बोलतोय ....* मला माझा मुलगा खूप त्रास देतोय , वेळेवर जेवण देत नाही , माझा दवाखान्याचा , औषधाचा खर्च करीत नाही आणि दारू पिऊन मला मारहाण व शिवीगाळ करतो , धमकी देतो .. मला जगणे मुश्किल झाले आहे. मी *रावेतच्या ब्रिजवर असून आत्महत्या करणार आहे...* त्यांचे बोलणे थांबवत मी त्यांना *धीर देत म्हणालो ,, अहो बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी येतोय तुमच्याकडे ..* आपण सर्व ठीकठाक करू ... आणि त्यावेळेस लागलीच रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना फोन करून सदर प्रकारची खबर दिली. *अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष हमीद शेख व महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर यांना तातडीने रावेत पोलीस स्टेशनला जायला सांगितले. त्यांनी वेळेवर पोहचुन आजोबाना आधार दिला व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना भेटून आजोबांसोबत घडलेल्या प्रकराची माहिती दिली.* नेहमीप्रमाणे पोलिसांनी प्रशनांची सरबत्ती केली. यांचे नातेवाईक कुठे आहेत ? तुम्ही कोण आहेत ? तुमचा काय संबंध ? परंतु अपना वतनच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती हाताळत प्रकारांचे गांभीर्य पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. शेवटी त्या दिवशी आजोबांचा जबाब घेऊन त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सही घेऊन सोडण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्ष बाबांना भेटून हकीकत ऐकल्यास अतिशय राग व संताप आला . परंतु आपण कायद्याच्या चौकटीत राहून शांतीलाल खात्री याना मदत करण्याचे ठरवले . *आजोबा हकीकत सांगत असताना वारंवार हात जोडत होते , रडत रडत बोलत होते मला माझ्या मुलापासून वाचवा . आजोबा सांगत होते कि, माझे वल्लभनगरला स्वतःचे घर आहे . त्याठिकाणी त्यांचा मुलगा दररोज दारू पिऊन यायचा , भांडण करायचा , टीव्ही फोडणे ,फ्रीज फोडणे ,आजोंबाचें मोबाईल फोडणे असे प्रकार तो करत असे , एकावेळेस तर त्याने स्वतःच्या वडिलांवर सिलेंडर उचलून डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला . बाथरूमच्या दरवाजे तोडले त्यामुळे मी वैतागून त्याला म्हणालो कि तू असा वागणार असशील तर इथून निघून जायला सांगितले . त्यावेळेस तो रावेत या ठिकाणी राहायला गेला . काही दिवसांनी परत वल्लभनगर येथील घराचे भाडे मिळत असल्याने , बाबा मी तुमची काळजी घेईन ,तुम्हाला सांभाळतो , औषध उपचार करतो म्हणून म्हणून रावेतला घेऊन गेला . तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवतो म्हणून गोड गोड बोलून मला काही कल्पना नसताना , मला इंग्रजी येत नसताना , काही पेपरवर माझ्या साह्य घेऊन माझ्या वल्लभनगर येथील मालकी घरचे बक्षिसपत्र बनवून घेतले. आता माझी काळजी घेत नसून मारहाण करणे ,शिवीगाळ करणे ,औषध व दवाखाना न पाहणे असे प्रकार करीत आहे , जेवायला सुद्धा मिळत नाही . हे सर्व सांगत असताना आजोबा खूप रडत होते.* दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाला प्रशांत खात्री याला अपना वतन संघटनेच्या वतीने संपर्क करण्यात आला . परंतु तो काही आला नाही . त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला . शेवटी त्यांच्या एका मुलीचा संपर्क झाला . त्यांना सर्व प्रकार कळविला . त्यांनी सुद्धा प्रशांत खात्री ला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . परंतु त्याची नजर वडिलांनी बक्षीसपत्रात दिलेल्या मिळकतीवर होती . तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने आजोबा व त्याच्या बहिणी सुद्धा त्याला खूप घाबरत होत्या . प्रशांत खात्री याने आजोबांचे म्हणणे ऐकले नाही .अपना वतन संघटनेने कुटुंबामध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला . परंतु प्रशांत खात्री याने आजोबांचे म्हणणे न ऐकल्याने संघटनेच्या वतीने आजोबाना कायदेशीर व आर्थिक सहकार्य करून रावेत पोलीस स्टेशन या ठिकाणी *प्रशांत खात्री यांच्याविरोधात ज्येष्ठ नागरिकआणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा २००७ नुसार कलम २३ , २४ , व भादवी कलम ४०६ , ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रावेत स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी विशेष सहकार्य केले .* पुढील कारवाई चालू असून ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायालयात दाद मागून आजोबाना न्याय मिळवून देण्यासाठी अपना वतन संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व ती मदत करीत आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह
सह संपादक अन्वरअली शेख