लिंबो स्केटिंग मधील विक्रमाबद्दल कु.देशना आदित्य नहारचा सन्मान

 राष्ट्रवादी काँग्रेसने केले कौतुक .


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :कु.देशना आदित्य नहारने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी लिंबो स्केटिंग या अत्यंत अवघड स्केटिंगच्या प्रकारामध्ये केलेल्या जागतिक विक्रमाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी यांनी सत्कार केला.देशना हिने फक्त 13.74 सेकंदांमध्ये 20 गाड्यांच्या खालून स्केटिंग केले.हा जागतिक विक्रम गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदला गेला आहे. 

 'अत्यंत धाडसी अशा या खेळामधील यश उल्लेखनीय आहे,तिने पुणे शहराची मान उंचावली आहे,यामध्ये देशनाच्या घरातील सर्व सदस्यांचा मोलाचा सहभाग आहे',अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी यांनी कौतुक केले . 'अजूनही मोठ्या जागतिक नोंदी होतील असे प्राविण्य मिळवेन,अशी खात्री  कु .देशना हिने सर्वांना दिली.याप्रसंगी  राकेश देशमुख, कुणाल पवार उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post