प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गुरुवार दिनांक 23 जून 2022, संत श्रेष्ट श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुकाम संत गाडगे महाराज आकुल धर्मशाळा, सोमवार पेठ येथे असताना वर्क चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वारकरींच्या सेवेत मोफत आरोग्य शिबीराचा आयोजन सोहळा संपन्न झाला.
या शिबीरात लांब प्रवासात होणारा त्रास पायांची वेदना, पोटाचे विकार किंवा सर्दी हातापायाची दुखःपतीवर योग्य उपचार डॉ आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.येथे डॉ निसार, आयुर्वेद हेल्थपॉइंट तर्फे वारकरींसाठी आयुर्वेदिक उपचार देखील उपलब्ध होता.
यावेळी वर्क संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष अवैस अंसारी सोबत मो. अन्वर, इरफान खाटिक, अब्दुल हमीद, मुबीन शैख, शोएब शैख इत्यादी उपस्थित होते. 500 पेक्षा अधिक वारकरी लोकांनी शिबीरचा लाभ घेतला.
कार्यक्रमची अधिक माहितीसाठी व्हिडीओ व फोटो साठी संपर्क करा.
अवैस अन्सारी
9673008234