प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे मनपा प्रशासनाच्या ढिसाळ आणि ठेकेदारप्रेमी कारभारामुळे शहर सर्वच भागात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. विशेषतः शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार या भागातील अरुंद रस्त्यांवर खोदकामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मलनिस्सारण, समान पाणीपुरवठा यामुळे सुरू असलेल्या रस्त्यांचे खोदकाम १५ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु जून अखेर पर्यंत देखील ही कामे पूर्ण होतील का याबद्दल शंका आहे. आम आदमी पक्षाची मागणी आहे की, प्रशासन आणि ठेकेदारांना या दिरंगाईबद्दल जबाबदार ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कामांच्या दरम्यान जर काही जीवितहानी झाली तर त्यासाठी सर्वस्वी पालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार धरण्यात यावेत.
"वर्षातील १२ ही महिने पुणे शहरात सातत्याने रस्त्यांची कामे सुरूच असतात, कधीही न संपणाऱ्या या रस्ते खोदकामांमुळे पुणेकर अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. जर यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्यास आम आदमी पक्ष संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.", *विजय कुंभार, आप राज्य संघटक तथा पुणे शहर कार्याध्यक्ष*