गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान व त्यांची टीम सतत पाठपुरावा करत होती.
पत्रकार मजहर खान यांचा सत्कार करण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : उर्दू शाळेला शनिवार ऐवजी शुक्रवारी अर्धा दिवसाची सुट्टी देण्याचा 2017 चा *जी आर* असुन ही पुणे मनपा याला लागु करत नव्हते हे कायदेशिरपणे लागू व्हावे म्हणून गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान व त्यांची टीम सतत पाठपुरावा करत होती.
या कामासाठी त्यांना स्थानिक नगरसेवक, पत्रकार ,वकील, स्थानिक नागरिक यांनी मदत केली. पण सुरुवात व शेवटपर्यंत लढले ते एजाज भाई .या कामासाठी तर मुस्लिम समाजाने एजाज भाई खान चे आभार मानले , सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगरसेविका फरजानाआपा अय्युब शेख, मुस्लिम बँक डायरेक्टर समीरभाई शेख,पत्रकार मजहर खान, सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान,मा.नगरसेवक व मुस्लिम बँक डायरेक्टर अय्युब शेख,ओबीसी चे इकबाल अन्सारी,मा.नगरसेवक अविनाश साळवे,मा.नगरसेवक संजय भोसले, आर पी आय चे शैलेशभाऊ,एड वाजेद खान, मा.नगरसेवक हनिफ शेख,व इतर मान्यवर उपस्थित होते.