शनिवारी चिंचवडमध्ये सिंहासनाची मिरवणूक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे, पिंपरी चिंचवड दि.१६ जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पुजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य तयार करून घेतलेले असुन ते १८ जून रोजी देहू संस्थांनकडे अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सिंहासनाचे पिंपरी चिंचवड मधील भक्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी शनिवारी ( दि. १८ जून) सिंहासनाची मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर सोमवारी (दि. २० जून ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देहू येथे सिंहासन आणि इतर साहित्य देवस्थानला अर्पण करण्यात येणार आहे .
गुरुवारी, (दि.१६ जून) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलास लांडे, श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, ह. भ. प. पुंडलिक महाराज मोरे, ह. भ. प. भानुदास महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. शेखर कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच सुरेश गारगोटे, सारिका पवार, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अभिषेकासाठी लागणारे सिंहासन व साहित्याची भव्य दिंडी मिरवणूक शनिवारी सकाळी ९ वा. आकुर्डी विठ्ठल मंदिरापासून आमदार अण्णा बनसोडे यांचे नवीन जनसंपर्क कार्यालय, काळभोर नगर, चिंचवड येथ पर्यंत काढण्यात येणार आहे. यावेळी पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगुलकर व श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांच्यासह राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रबोधनकार,समस्त वारकरी संप्रदाय व शहरातील भजनी मंडळी व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. अण्णा बनसोडे यांनी केले.
या धार्मिक सोहळ्यात पिंपरी चिंचवड मधील नामांकित अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर, अखिल वारकरी प्रबोधन महासंघाचे अध्यक्ष ह. भ. प. रामेश्वर महाराज शास्त्री, ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे, ह. भ. प. शिवानंद महाराज स्वामी, (कासारवाडी), ह. भ. प. तुकाराम महाराज, (सांगवी), ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी), ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह. भ. प. संतोषानंद महाराज शास्त्री, ह. भ. प. उद्धव महाराज कोळपकर, ह. भ. प. मंगलदास महाराज जगताप, ह. भ. प. अर्जुन महाराज जाधव, ह. भ. प. अशोक महाराज जाधव, ह. भ. प. केशव महाराज टिंगरे, ह. भ. प. शेखर महाराज जांभूळकर, ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप, ह. भ. प. प्रकाश महाराज काळे, ह. भ. प. भानुदास महाराज तुपे आदींसह पिंपरी चिंचवड शहरातील भक्त, भाविक गण उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळी सामुदायिक भजन आणि महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे हि आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले.
प्रेस मीडिया लाईव्ह
सह संपादक; अन्वरअली शेख