अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल..... आजाद समाज पार्टी व इतर संघटना.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे.. प्रेषित मोहम्मद पैगंबर(स.)यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिदांल यांच्यावर भारतीय दंड संहिंतेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आजाद समाज पार्टी व इतर संटनेच्या वतीने प्रवक्ते फिरोज मुल्ला(सर) यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले .
यावेळी आजाद समाज पर्टीचे पुणे शहर अध्यक्ष भिमराव कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रहीमभाई सय्यद, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा गौसिया खान,शिवसेनेचे छ.शि.म.संघाचे गट प्रमुख गणेश शिंदे, छ.शि.म.संघाचे अध्यक्ष संदिप शेंडगे, शरद लोखंडे, सागर जावली आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.....
(प्रवक्ते फिरोज मुल्ला(सर) आजाद समाज पर्टी, प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, जनसंघर्ष क्रांती मोर्चा, जनशक्ती विकास संघ)
Tags
पुणे