प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरातील बहुसंख्य नागरिकंसाठी पीएमपीएमल एक प्रकारे मुंबई लोकल प्रमाणे जीवनवाहिनीच आहे. परंतु पीएमपीएमल प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा मात्र बोजवारा उडाला आहे. आम आदमी पक्षाचे पीएमपीएमल समन्वयक सेंथिल अय्यर आणि आप टीम सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा करुण प्रश्न सोडविन्याचे प्रयत्न करत आहेत.
एप्रिल २०२२ पासून दर महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास ही योजना पीएमपीएमलने सुरु केली आहे. परंतु आम्ही काढलेल्या माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील केवळ १४ मार्गावर या तेजस्विनी बस उपलब्ध असतात. आम आदमी पक्षाची मागणी आहे की शहरातील सर्वच मार्गावर तेजस्विनी बस उपलब्ध करुन द्याव्यात. किती महिलांना या मोफत बस प्रवासाचा लाभ झाला याची कुठलीही आकडेवारी पीएमपीएमल प्रशासनाकडे उपलब्ध नाही, ही माहिती मुद्दाम हेतुपुरस्सरपने दडपन्यात आली आहे. आम्ही पीएमपीएमल प्रशासनाला मागणी केली आहे की त्यांनी या दिवशी महिलांना झिरो टोकन उपलब्ध करुण द्यावे जेणेकरून या पूर्ण योजनेत पारदर्शकता येईल.
दिल्लीत आप सरकारने महिलांना कायमस्वरूपी मोफत शहर बससेवा उपलब्ध केली आहे, पुणे मनपामध्ये आप सत्तेवर आल्यास इथेसुद्धा हाच निर्णय घेण्यात येईल.
आपने माहिती अधिकारात पीएमपीएमल बस स्थानकांवर राजकीय पक्षांच्या जाहिरातिबद्दल प्रश्न विचारला होता, परंतु मिळालेल्या उत्तरात पीएमपीएमल ने सांगितले की बस स्थानाकांवर कुठेही राजकीय पक्षांच्या जाहिराती नाहीत, परंतु आमच्या पाहनीत हे पूर्णतः खोटे आढळून आले आहे. यासंबधिचे पुरावे आम्ही प्रेस नोट सोबत जोड़त आहोत. आपची मागणी आहे की अशा अनाधिकृत तसेच फुकट केल्या जाणाऱ्या जाहिराती पीएमपीएमलने त्वरित थांबवाव्यात तसेच संबंधित राजकीय पक्षांना मोठा दंड लावावा.
पीएमपीएमएल मधील कामगार अतिशय विदारक परिस्थितीत आहेत, २२०० हंगामी कामगाराना सेवेत कायम करुन घेण्यासाठी आप कडून पीएमपीएमएल संचालक यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या निकालानंतर देखील या कामगाराना अजून पर्यंत सेवेत कायम केलेले नाही. आम आदमी पक्ष
पीएमपीएमएल प्रशासनाला १५ जून पर्यंतची मुदत देत आहे, अन्यथा आपकड़ून तीव्र लढ़ा उभारण्यात येईल.
"सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करणे, शहर वाहतूक कोंडी मुक्त करणे, विदृपिकरण थांबविने तसेच पीएमपीएमएल भ्रष्टाचार मुक्त करने यासाठी आम आदमी पक्ष लढत आहे, सातत्याने पाठपुरावा करत आहे. पीएमपीएमएल सुधारनेसाठी आपचे प्रयत्न असेच अविरत सुरुच राहतील.", सेंथिल अय्यर, आप पीएमपीएमएल समन्वयक.
यावेळी पत्रकार परिषदेस आप पीएमपीएमएल समन्वयक सेंथिल अय्यर, शहर प्रवक्ते विद्यानंद नायक, नरेंद्र देसाई, प्रभाकर कोंधळकर उपस्थित होते.*