प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे दि.13: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ८ डिसेंबर २०१९ व ९ डिसेंबर २०१९ या दोन दिवसांच्या प्रशासकीय कारणास्तव पडलेल्या खंडास खंडीत कालावधी म्हणून घोषित करण्यास तसेच या खंडीत कालावधीतील पात्र विमा दावे मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
खंडीत कालावधीतील प्राप्त विमा दावे मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने कृषी आयुक्त यांना प्राधिकृत केले आहे. या योजनेतंर्गत अपघातात शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास दोन लाख रूपये व अपंगत्व आल्यास प्रकरणपरत्वे १ लाख ते २ लाख याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.
या कालावधीत अपघात झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यातील परीपूर्ण विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.