प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक सायकल दिनानिमित्त आज 3 जुन रोजी आगाखान पॅलेस ते डेक्कन कॉलेज या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये जनतेचा सक्रीय सहभाग वाढविण्यासोबतच स्वातंत्र सेनानी व ऐतिहासिक स्थळांची माहीती नवीन पिढीला व्हावी, फिट इंडीया व शरीर स्वास्थ्य, पर्यावरण, विद्युत बचत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीच्या उदघाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उप पोलीस आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपसंचालक यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालक डी कार्थीकेयन, डेक्कन कॉलजेचे प्र. कुलगूरू प्रसाद जोशी, पूना कॉलेजचे प्राचार्य शेख अन्वर आफताब उपस्थित राहणार आहेत.
संपुर्ण देशात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यकार्यक्रम देशातील निवडक 75 जिल्ह्यात आयोजित केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, वर्धा, रत्नागिरी या चार जिल्हयांचा समावेश आहे. राज्यातील 354 तालुक्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीचे उदघाटन आगाखान पॅलेस येथे सकाळी 7 वाजता होईल. शास्त्री चौक- गुंजन टॉकीज चौक - बंडगार्डन, डॉ बाबासाहेब आंबेडकर सेतू- शार्दुल बाबा दर्गा मार्गे डेक्कन कॉलेज येथे सकाळी 8 वाजता समारोप होईल. सायकल रॅलीच्या अधिक माहीतीसाठी श्री. यशवत मानखेडकर-9860798557, सिध्दार्थ चव्हाण 9892301372 स्वप्नील शिंदे – 8600347123 या क्रमांकावर संपर्क साधावा. या सायकल रॅली कार्याक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मानखेडकर यांनी केले आहे.