प्रेस मीडिया लाईव्ह :
राजाभाऊ पोटे :
पुणे : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांना देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरसांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव भालेराव रामदास सोनावणे , संतोष कांबळे , संजय भोसले , सुभाष जाधव आदी उपस्थित होते. या वेळी पुणे शहर चर्मकार समाजाच्या वतीने सोमनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा राजाभाऊ पोटे कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी दिल्या.