प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वानवडी येथील ‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 जून रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत होणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांनी दिली.
या शिबिरात हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारीका, सहाय्यक वर्ग वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणार आहे. या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे.
Tags
पुणे