अलीकडे होणाऱ्या बंडाना काही प्रमाणात जनताही जबाबदार आहे, काहीजण पुन्हा याच लोकांच्या मागे जातील.
प्रेस मीडिया लाईव्ह :
ऐन शेतीच्या हंगामात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री हिंदुत्वाच्या नावाखाली बंडखोरी करत आसामला जातो... महाराष्ट्रातील शेतकरी हिंदू नाहीत?...उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी याच काळात प्रयत्न करत असतात अशा वेळी उच्च शिक्षण मंत्री देखील त्या गटात सामील होतात...या राज्यात शिक्षण घेणारे तरुण हिंदू नाहीत ? जवळपास सात मंत्री आणि 50 आमदार जनतेची कामे सोडून जर सत्तांतर करण्यासाठी येन पावसाच्या तोंडावर हा तमाशा करत असतील तर याला सामान्य नागरिक म्हणून आपणही तितकेच जबाबदार आहोत
यांना बंड आणि सत्तातंर करायचेच होते तर ते मे महिन्यात देखील करता आले असते,महाराष्ट्रात राहून करता आले असते,मात्र या आजच्या लोकप्रतिनिधीची जनतेप्रति नाळ तुटलेली आहे उपकार करावे तसे हे काही त्यांच्या मर्जीतील लोकांना मदत करतात...व्यापक जनहित पासून आजची लोकशाही दूर जात चालली आहे. आम्ही नेहमी सांगतो... जो ठेकेदार आहे,जो बिल्डर आहे,जो धनदांडगा आहे तो गरिबांचा, सामान्य जनतेचा खरा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही... आजचे चित्र हेच वास्तव स्पष्ट करणारे आहे.करोडोंचे व्यवहार करणाऱ्यांना गरिबांचे प्रश्न काय म्हणून कळणार आहेत..?
भारतीय जनतेमध्ये आजही लोकशाही मूल्य रुजलेली नाहीत म्हणून निवडणुका म्हणजे लोकशाही असा गैरसमज आपण करुन बसलो आहोत.सरकार कुणाचेही असो,ते जनतेला बांधील हवे जर तसे नसेल तर जनतेला प्रत्येक पावलावर गृहीत धरले जातेय हे लक्षात घ्यायला हवं!