प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील बहुमत चाचणीबाबत महत्वपुर्ण निकाल दिला आहे. महाविकास आघाडीकडून केलेल्या सर्व युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून उद्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणी बाबत कोणताही स्टे आणला नाही आहे.त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे.
या वेळी देखील त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधत शरद पवार आणि सोनिया गांधींनी दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला.आज झालेल्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचा धडका लावला आहे. यामध्ये उस्मानाबाद शहराचं नाव "धाराशीव" तर औरंगाबाद शहराचे नाव "संभाजीनगर" करण्यास मान्यता दिली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता दिली आहे. तसेच राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केला जाणार असून कर्जत जि. अहमदनगर येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन केला जाणार आहे.
अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय असा निर्णय देखील घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेची फेसबुक लाईव्ह द्वारे साधलेला शेवटचा संवाद
मी आश्वस्त केले होते की जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली. सरकार म्हणून अनेक कामे केली यामध्ये रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आहे की, या कामांमुळे माझं आयुष्य सार्थकी लागले. संभाजीनगर नामकरण केले. शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा मिळवून दिली. तसेच एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी यांनी मला खुप सहकार्य केले त्यामुळे त्यांचे धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते. कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामा निराळे ज्यांचा विरोध भासवला.अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले. ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिलं. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज. ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत. हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.
आज न्याय देवतेने निकाल दिलाय. फल्लोर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले, आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले. तुमची नाराजी कोणावर आहे ? ते सुरतला गुवाहटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला. स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे. लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.