शिंदे भाजपा मध्ये जाणार का..? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का?
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे.त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे भाजपामध्ये जाणार का? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सर्व चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अटी ठेवल्यात याची महत्त्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
अटी पुढील प्रमाणे :
१. एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत. पण भाजप सोबत युती करून फडणवीसांना मुख्यमंत्री आणि मला उपमुख्यमंत्री करा.
२. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे.
३. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत.
४. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठं बंड :
शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.