सुशिक्षित बेरोजगार उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी आमदार विलास लांडे,युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी दि. १८ पिंपरी चिंचवड शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी आमदार विलास लांडे,युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
*याप्रसंगी बोलताना या अभिनव उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ शहरातील बेरोजगार गरजू तरुणांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.*
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, सध्या तरुणांपुढे बेरोजगारीचे आव्हान मोठे आहे. या पार्श्वभूमीवर दहावी ते पदवीधर सुशिक्षित तरुण-तरुणींना त्यांच्या योग्यतेच्या नोकऱ्या मिळवण्याकामी कंपन्या आणि बेरोजगार यांच्यात एक पूल बनण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले असून १० दिवसांनी नोंदणी अभियानाच्या समारोपानंतर भव्य बेरोजगार मेळावा आयोजित करणार असल्याचे शेख म्हणाले.
कार्यक्रमास महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक नाना काटे, संजय वाबळे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर,विजय लोखंडे, धनंजय भालेकर, नारायण बहिरवडे, युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, नीलेश निकाळजे, योगेश गवळी, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवक उपाध्यक्ष दिनेश पटेल, शादाब खान, आयुष निंबारकर, तुषार ताम्हणे, सरचिटणीस अनुज देशमुख, दीपक गुप्ता, सचिव निखील गाडगे, ऋषिकेश गरडे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म जाहीर करण्यात आले. शनिवार दि. १८ जूनपासून सुरू झालेले हे अभियान २८ जून २०२२ पर्यंत असणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अधिक माहितीसाठी ९६०७४११०१० या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपल्या जवळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.