प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि.११ पिंपरी येथील मक्का मस्जिद काळेवाडी फाटा या ठिकाणी जमियेत उल्मा हिंद पिंपरी चिंचवड अध्यक्ष हाजी गुलजार यांच्या हस्ते थेरगावच्या तमन्ना शेख ( Tamanna Sheikh ) हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला .
या स्पर्धा परिक्षेमध्ये ( 2021-22 ) तमन्ना शेख हिने उत्कृष्ट असे यश मिळवले व नायब तहसीलदार पदी तिची निवड झाली . त्यामुळे जमियेत उलाम हिंद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष हाजी गुलजार, सामाजिक कार्यकर्ते मौलाना इस्लामुद्दिन, तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकयांच्या, आणि सामान्य जनसमुदायाच्या वतीने तमन्ना शेख यांचे कौतुक केले जात आहे, तमन्नाच्या घरची परिस्थिती बिकट असून तिची आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते , तर वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत . थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणाऱ्या तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता( सेल्फ स्टडी) करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि मुलींमध्ये राज्यात 8 वी , सर्वसाधारण गटात 106 वी येऊन तमन्ना शेख यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली,आणि तमन्ना शेख यांनी लहानपणी पाहिलेले आपले स्वप्न पूर्ण केले. असे प्रेस मीडिया लाईव्ह शी बोलताना दिली
हाजी गुलजार म्हणाले आम्ही येणाऱ्या पुढच्या काळासाठी मुस्लिम समाजामधील तळागाळातील तरुणईसाठी मक्का मस्जिद काळेवाडी फाटा येथे( MPSC ) कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण देण्याचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,तसेच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविण्याचे मोलाचे कार्य करण्यासाठी नेहमी अग्रसर असतात.आणि पिंपरी काळेवाडी फाटा येथे मक्का मस्जिद या ठिकाणी लवकरच विविध प्रकारचे शैक्षणिक कोचिंग क्लासेस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत अशी घोषणा हाजी गुलजार अध्यक्ष जामियेत उलमा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आली.
मौलाना इस्लामुद्दिन यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.