भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून कोणती खेळी खेळली

 भाजपमध्ये अंतर्गत वाद तर सुरु नाही, ना अशी चर्चा सुरू आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात  पुन्हा एकदा भाजपचे धक्कातंत्र बघायला मिळाले. शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावे अशी मागणी होत होती. मात्र भाजपने अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांना धक्का देत, त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. खरे तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते.

असे असतांना त्यांची वरचे पद देण्याऐवजी भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून कोणती खेळी खेळली, यावर राज्यात बरीच चर्चा सुरु झाली आहे. या सरकारमध्ये मी कोणताही मंत्री नसेन पण भाजपचे आमदार मंत्रिमंडळाची शपथ घेतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र काही तासांच्या राजकीय नाटयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपने घोषित केले. आणि फडणवीस यांनी देखील त्याला मान्यता देत शपथ घेतल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद तर सुरु नाही, ना अशी चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post