मराठी भाषेच्या नियोजन कार्यशाळेत व्यंगचित्र, ग्राफिटी आणि काव्य या विषयांच्या विशेष विभागाची केली सुचना .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई विद्यापीठ, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग याबाबत हे काम करीत आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मराठी प्रेमींना एक जिव्हाळ्याच्या विषयावरचे काम मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने होत आहे ही एक अत्यंत भावनिक आणि मनाला भिडणारी बाब आहे.
मराठी भाषा भवन उभे राहत असतानाच राज्यात मराठी भाषेच्या विकासाचे काम होत असतानाच पद्य कविता, ग्राफिटी यांच्यासोबत व्यंगचित्र या महत्त्वाच्या कला प्रकाराची निर्मिती व त्याबाबतच्या प्रक्रिया याबाबतचे संहितीकरण भाषेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक मराठी साहित्यिक महत्त्वाच्या पैलूबाबत चिंतन व अभ्यास होईल.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र बाबत विशेष योगदान होते. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत या विषयात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तिला त्यात स्थान असावे, असे आवाहन आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व काम करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी काम करणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता पाडणार नाही, असे यावेळी मराठी भाषा विभाग मंत्री ना. श्री. सुभाष देसाई यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिकांना मराठी शब्दकोश पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय ना. सुभाष देसाई यांनी हे पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. या कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.रेणुका ओझरकर, श्री. भूपाल रामनाथकर, भाषा संग्रहालयाचे संचालक श्री. सव्यासाची मुखर्जी, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गाग राणी, सहसचिव मिलिंद गवादे, संजय पाटील, विशेष कार्य अधिकारी सुचित्रा देशपांडे, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते.