प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू यांच्या 174 व्या जयंतीनिमित्त विधान भवन मुंबई येथे आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी शाहू महाराजांनी आपल्या राज्याचा कारभार करताना न्याय बुद्धीचा वापर करून सामान्यांच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित केले. सैनिकी शिक्षण, मुलींना व सामाजिक मागासांना शिक्षणात प्राधान्य , विविध धरणे निर्मिती, तुकडे बंदीचा कायदा अशा विषयांत भरीव काम केले. विशेषतः वेगवेगळ्या आजारांमध्ये जनतेला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. शाहू महाराजांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी उपसभापती कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, अवर सचिव रविन्द्र जगदाळे आणि विधान भवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.