प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी शिवाजी चौकातील शिवपुतळयास राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक श्री.बाळासाहेब होनमोरे, विद्यामंदिर प्रशाला संस्थेचे अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थितीत यांच्या शुभ हस्ते अभिषेक व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तसेच नगरसेवक करण जामदार, नगरसेवक शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, सचिन जाधव, संदीप सलगर, माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे, डॉ.भालचंद्र साठ्ये, रघुवीर चव्हाण, जिजाऊ चारिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे मिरज शहराध्यक्ष धनंजय हलकर (शिंदे), चंद्रकात शिंदे,अशोकसिंग राजपूत, सुधीर अवसरे, पै.राजेंद्र रामचंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.भिमराव धुळबुळू (सर) यांची निवड झालेबद्दल बाळासाहेब होनमोरे साहेबांच्या हस्ते सत्कार करणेत आला व संचालक म्हणून नामदेव भोसले (पत्रकार) यांची निवड झालेबद्दल नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून सर्वाना साखर पेढे वाटणेत आले. या कार्यक्रमास विजयराव अस्वले,रामचंद्र रानभरे, महादेव नलवडे, लक्ष्मण शिंदे, अशोकराव कोळशे, ॲड. फैयाज झारी, ज्ञानेश्वर रेळेकर (सावकार), राजाराम तांबडे, बाळासाहेब स्वामी, किरण भुजुगडे, नरेंद्र मोहिते (महाराज), विनायक यादव, यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश पवार यांनी स्वागत तर आभार जिजाऊ चारिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय यांनी मानले.