प्रेस मीडिया लाईव्ह :
माणकापूर : बहुजन प्रेस क्लबचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व निर्माते, दिग्दर्शक- मा. सखाराम जाधव, शिरदवाड ता. शिरोळ यांच्या कन्या व भुमिका भाग १ व २ या लघुचित्रपटाच्या मुख्य युवा अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हा अध्यक्षा- मा. कु. मोनिका सखाराम जाधव यांचा सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन मा. बालाजी भांगेसो, पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस स्टेशन यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. डॉ.प्रा. शिवाजीराव शिंदे, सर ( नुतन कन्या प्रशाला सेलू- परभणी ) , सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- अॕड. ममतेश आवळे; मा. प्रा. जे. पी. जाधव, सर (उपप्राचार्य- सहकार भूषण एस. के.पाटील महाविद्यालय कुरुंदवाड ) मा. सौ. वंदना हरिश कांबळे ( लोकनियुक्त सरपंच- दानवाड ); मा. उदय डांगे ( पक्षप्रतोद कुरुंदवाड नगरपरिषद ); मा. फारुख जमादार ( नगरसेवक कुरुंदवाड नगरपरिषद ); मा. सुरेशराव केसरकर ( राज्य अध्यक्ष- गुणवंत कामगार असोसिएशन ); मा. ईर्शाद शेख ( लबैक फाऊंडेशन हुपरी); मा. शिवाजी येडवान- दैनिक महासत्ता वार्ताहर व अध्यक्ष- निसर्गराजाग्रुप माणकापूर आणि उपाध्यक्ष- विठ्ठल काटकर; आप्पासाहेब भोसले; कवि सरकार इंगळी; शशिकांत पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह राहुल कांबळे; संजय पाटील; अमोल मोहिते; बाळासाहेब गायकवाड; उत्तम बिरंगे; गणपती शिंदे; अविनाश गोपाळे; सचिन बिरंगे; संजय सुतार; रवींद्र कांबळे; राहुल माने; विविध क्षेत्रातील पदाधिकारी; सदस्य व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.