प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एक जून पासून मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमत प्रति सिलिंडर 135 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आता किती झाले व्यावसायिक सिलिंडरचे दर...
या बदलानंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची (कमर्शियल एलपीजी सिलेंडर) किंमत 2,219 रुपयांवर आली आहे. यापूर्वी हे सिलिंडर 2,354 रुपयांना मिळत होते. त्याचप्रमाणे, व्यावसायिक सिलिंडरची किंमत कोलकात्यात 2,454 रुपयांवरून 2,322 रुपयांवर, मुंबईत 2,306 रुपयांवरून 2,171.50 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये 2,373 रुपयांवरून 2,507 रुपयांवर आली आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.