प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : (जिमाका) : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-1 या खंडाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.26 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार असल्याची माहिती पुरालेखागारच्या सहायक संचालक दिपाली पाटील यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यास रमेश जाधव, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत उपस्थित राहणार आहेत.