प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा सांख्यिकी कार्यालय व इतर आस्थापनेवर कार्यरत सांख्यिकी कर्मचा-यांच्यावतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी चालू वर्षी शाश्वत विकासाकरिता सांख्यिकी ही संकल्पना राबविण्यात आली असून भविष्यातील सांख्यिकीचे महत्व त्यांनी यावेळी विषद केले.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांनी महालनोबीस यांच्या कार्याची ओळख करुन दिली. किरण देशपांडे यांनी प्रास्ताविक तर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्राजक्ता सांळुखे यांनी आभार मानले.