प्रसाद कुलकर्णी यांना भाई माधवराव बागल पुरस्कार 'प्रदान

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर येथे भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 'भाई  माधवराव बागल पुरस्कार ' समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांना सपत्निक शाहू स्मारक भवनमध्ये एका शानदार समारंभात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथे भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती व संस्थांना  'भाई माधवराव बागल पुरस्कार ' देवून सन्मानित करण्यात येते.यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.नुकताच कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये एका शानदार समारंभात प्रसाद कुलकर्णी यांना 'भाई  माधवराव बागल पुरस्कार ' ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.अशोकराव साळोखे होते.

यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतांना आजच्यासारखा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय अस्वस्थतेचा काळ कधीच अनुभवाला आला नव्हता. व्यक्तिगत धर्मापेक्षा राष्ट्रधर्म मोठा आहे हा शाहू राजांचा विचार बाजूला पडून धर्मांधता आणि परधर्म द्वेषाचे विकृत राजकारण जाणीवपूर्वक केले जात आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता समाजाचे चुकीच्या पद्धतीने ध्रुवीकरण केले जात आहे. अशावेळी या व्यवस्थे विरोधात कमालीच्या  सातत्याने आवाज उठवणार्‍या प्रसाद कुलकर्णी यांचा भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन उचित गौरव केला जात आहे ही अभिनंदनाची बाब आहे, असे मत व्यक्त केले. 

प्रारंभी भाई माधवराव बागल यांच्या प्रतिमेला प्रसाद कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाहीर रंगराव पाटील यांनी कवी श्रीनिवास यादव लिखित आणि श्याम सुतार यांनी संगीतबद्ध केलेले बागल गौरव गीत गायले. कॉ.चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांनी करून दिला. संभाजीराव जगदाळे यांनी गौरव पत्राचे वाचन केले.सन्मानचिन्ह, शाल, फेटा, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बागल विद्यापीठाच्या शिबिरातून आपल्यातील कार्यकर्ता घडण्यात मोठी मदत झाली याचा उल्लेख करून आणि कृतज्ञता म्हणून पुरस्काराच्या रकमेत एक हजार रुपयाची भर घालून प्रसाद कुलकर्णी यांनी सहा हजार रुपये बागल विद्यापीठाला देणगी रूपाने दिले.

यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीचा व उपक्रमशीलतेचा उल्लेख केला. तसेच आचार्य शांतारामबापू गरुड, प्रा.डॉ.एन.डी.पाटील ,कॉम्रेड गोविंदराव पानसरे ,प्राचार्य म.द.देशपांडे आदी अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या  मुशीतून माझ्यातला कार्यकर्ता घडत गेला , हे स्पष्ट केले. 

यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ.राम पूनियानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठवलेला संदेश प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी वाचून दाखविला. या कार्यक्रमास सरोजमाई पाटील,प्रा.डॉ.जे.एफ.पाटील ,डॉ. रमेश जाधव ,डॉ. बी.एम. हीर्डीकर,प्रा.डॉ.अरुण भोसले, एम.बी.शेख, सुभाष नागेशकर दलितमित्र डी.डी.चौगुले ,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, विजतज्ञ प्रताप होगाडे ,माजी आमदार राजीव आवळे, जयकुमार कोले,डॉ.चिदानंद आवळेकर,प्राचार्य डॉ.सुनील हेळकर,शशांक बावचकर,मेघा पानसरे,दिलीप पोवार,प्रा.शिवाजी होडगे,प्रा.अनिल उंदरे, वसंतराव मुळीक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजवादी प्रबोधिनीच्या अनेक शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान ,या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post