लवकरच न्याय मागणीसाठी सदरचा व्हिडीओ हा आय जी कार्यालयात तसेच त्या मेडीएटरच्या वडिलांच्या संबंधित शासकीय कार्यालयात सादर करणार.. गणेश पाखरे
प्रेस मीडिया लाईव्ह :
खिद्रापूर: येथे सन 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या लोकांना निवारा देण्यासाठी अभिनेता सलमान खान पुढे झाले. त्यांनी खिद्रापूरमधील 70 घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. याकरिता एलान फौंडेशन व जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेत करार होऊन घरांचे बांधकाम सुरू करणेत आले.
यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सरपंच आणी ग्रामसेवकांना पैसे कोणाकडे भरायचे यासंबंधात विचारणा करावयास गेले असता त्यांनी गावातीलच एकाचे नाव सांगून तो मेडीएटर असल्याचे सांगत त्यास भेटावयास सांगितले. त्यास गीता पाखरे ह्या पैसे घेऊन भेटावयास गेल्या असता त्या मेडीएटरच्या कुटुंबातील लोकासहित सर्वजन त्यांचा अंगावर धावून गेले आहेत. ही घटना समजताच स्वतः गणेश पाखरे घटनास्थळी गेले असता त्या मेडीएटर यांच्या वडिलांच्या शासकीय कार्यालयात पाखरे दाम्पत्यांना बोलावून नेऊन त्यांनी न काढलेल्या कायदेशीर नोटिशीची विचारणा करीत त्या मेडीएटर च्या वडीलांनी जे शासकीय कार्यालयात कर्मचारी आहेत त्यांनी भिंतींवर हाताने रेषा ओढीत जीवे मारण्याची धमकी पाखरे दाम्पत्यांना दिल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. लवकरच न्याय मागणीसाठी सदरचा व्हिडीओ हा आय जी कार्यालयात तसेच त्या मेडीएटरच्या वडिलांच्या संबंधित शासकीय कार्यालयात सादर करणार असून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गणेश पाखरे यांनी दिली आहे.