प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : आज इचलकरंजी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांचे इचलकरंजी भाजपाच्या वतीने जोरदार सहर्ष स्वागत करण्यात आले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या कल्पकतेतून अतिशय चांगला उपक्रम चालू करण्यात आला आहे.तो उपक्रम म्हणजे बुथ सक्षम करण्यासाठी प्रत्येक बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकारणी सदस्य, आघाडी प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते यांच्या घरावर त्यांच्या नावाची पाटी लावणे, आणि या नाम फलकाचे उध्दघाटन केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले.
बुथ प्रमुख अर्जुन सुतार या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी केंद्रीय मंत्री पक्ष वाढीसाठी येतात. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्याच्यामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नंतर युवा कार्यकर्त्याच्या मोटर सायकल रॅलीने मंत्रीमहोदयांच्या हस्ते शिवतीर्थावर जाऊन शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करण्यात आले.
यंत्रमाग जागृती संघटना, रेल्वे कृती समिती, भाजपा विणकर आघाडी या संघटनेने विविध प्रश्नावर मंत्रीमहोदय यांना निवेदन देण्यात आले.तसेच इचलकरंजी भाजपा वतीने इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील रुकडी उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे म्हणुन निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्रीमहोदय यांनी याबाबत लवकरच पाठपुराव करू असे आश्वासन दिले.
यावेळी मिश्रीलाल जाजु, सतीश डाळ्या, अजितमामा जाधव, धोंडीराम जावळे, शहाजी भोसले, अमर कांबळे, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, सतीश पंडित, सौ.पूनम जाधव, सौ.अश्विनी कुबडगे, विनोद काकांनी, राजेंद्र पाटील, दिपक राशिनकर, म्हाळसाकांत कवडे, प्रविण पाटील, सौ.नीता भोसले, सौ.योगिता दाभोळे, संध्या बनसोडे, सौ.नागुबाई लोंढे, सौ.संगीता घोरपडे, सौ.निर्मला कुरुंदवाडे, सौ.पूजा बेडगकर, सौ.स्वाती मोरे, ऋषभ जैन, किरण दंडगे, बाळकृष्ण तोतला, राजू बोरा, किसन शिंदे, सुकुमार पाटील, प्रदिप धोत्रे, इम्रान बागवान, उत्तमसिंग चव्हाण, आण्णा आवळे, राजू भाकरे, उमाकांत दाभोळे, अर्जुन मोरे, ईश्वर कांबळे, अरविंद चौगुले, हमेंत वरुटे, केशव रायकर, आनंद पारिक, शंकर सुतार, प्रविण बनसोडे, उमेश गोरे, मनोज तराळ, जयवंत पाटील, शिवानंद रावळ, ग्रा.पं.सदस्य सुनील काडाप्पा, फिरोज बांगी, सतीश गावकर, शंकर झित्रे, सचिन माळी, विपुल खोत, सिद्धलिंग बुक्का आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.