प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे जैन ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने काल रविवारी जैन समाज बांधवांसाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य सुविधा योजना नोंदणी शिबीर घेण्यात आले.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांना कोणत्याही आजारांवरील उपचारासाठी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय आरोग्य सुविधा योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ जैन समाज बांधवांना मिळावा ,या उदात्त हेतूने जैन ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने पुढाकार घेवून आज रविवारी राष्ट्रीय आरोग्य सुविधा योजना नोंदणी शिबीर घेण्यात आले.यावेळी इचलकरंजी शहरासह विविध गावांमधून जैन समाज बांधव उपस्थित राहून नोंदणी अर्ज शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर योजनेसाठी अर्ज भरलेल्या नागरिकांना लवकरच आरोग्य सुविधा योजनेचे कार्ड सुपूर्द करुन त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे जैन ग्राहक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले.
https://youtu.be/hY6-qTwhoAg
यावेळी शिबीरासाठी इचलकरंजी शहर परिसरासह विविध ठिकाणचे जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबीर यशस्वीतेसाठी जैन ग्राहक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष प्रकाश शानवाडे , खजिनदार राजेंद्र सदलगे , सेक्रेटरी राजेंद्र चौगुले , संचालक ओमकार पाटील ,नेमिनाथ चौगुले ,वैभव चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.