प्रेस मीडिया लाईव्ह :
इचककरंजी ता. २६ राजर्षी शाहू महाराज कृतिशील,लोकराजे होते. सव्वाशे वर्षांपूर्वी त्यांनी लोकशाही व्यवस्थेने आदर्श घ्यावा असा सामाजिक न्यायाचा राज्यकारभार केला. पन्नास टक्के आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा, अस्पृश्योद्धार ,माणगाव परिषद, जातीभेदाशी-धर्मभेदाशी मुकाबला ,स्त्रियांच्या संरक्षणाचे कायदे, शैक्षणिक क्रांती व वसतिगृहांची उभारणी ,क्षात्र जगद्गुरु पदाची निर्मिती, कामगार चळवळीला चालना, शेती - उद्योग- सहकार यांचे विस्तारीकरण ,शिकार - मल्लविद्या- -संगीत-नाटक-चित्रपट- चित्रकला आदी कलांना प्रोत्साहन, राधानगरी धरणाची निर्मिती, प्रबोधनाची भविष्यवेधी भूमिका अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये शाहू राजांच्या राज्यकारभारात दिसून येतात. त्यांच्या या विचारांवर कार्यरत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते इचलकरंजीतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राजर्षी शाहू जयंतीनिमित्त राजर्षींना अभिवादन करताना ते बोलत होते.
प्रारंभी कामगार नेते दत्ता माने व ज्येष्ठ पत्रकार डी.एस.डोणे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रवी रजपुते ,भाऊसाहेब आवळे, सदा मलाबादे, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे,धोंडीबा कुंभार ,पांडुरंग पिसे, प्रा.अशोक कांबळे ,बजरंग लोणारी,प्रा.रमेश लवटे, तुकाराम अपराध,,रामभाऊ ठीकणे, राजन मुठाणे,शकील मुल्ला, बी.जी.देशमुख, सुनील बारवाडे,विकास चौगुले,मनोहर जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.