कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करा !

 कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे मागणीसाठी धरणे आंदोलन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच याबाबत काहीच हालचाल होत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात घुसून अधिका-यांना घेराव घालत प्रलंबित कामांबाबत निपटारा होत नसल्याचा चांगलाच जाब विचारला.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभ देण्याचे काम चालते.मात्र या कार्यालयातील काही अधिकारी व कंञाटी कामगारांनी पाञ कामगारांच्या अर्जात जाणीवपूर्वक ञुटी काढून त्यांना कल्याणकारी मंडळाच्या योजनेतील विविध लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.तसेच एजंटामार्फत दिलेले अर्ज माञ तात्काळ मंजूर केले जात असून यामागचे नेमके गौडबंगाल काय ,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.त्यात काही अधिका-यांच्या कामचुकारपणामुळे नवीन १५०० व नुतनीकरणाचे १७००

अर्ज प्रलंबित आहेत.याबाबत विचारणा केली असता ञुटी काढणे किंवा थातुरमातुर उत्तरे देण्याचे प्रकार काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून सुरु आहेत.त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी आणि प्रलंबित अर्ज मंजूर करुन गरजू कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनेच्या सुविधांचा लाभ मिळवून द्यावा ,या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.त्यांनी देखील सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुसार कार्यालयातील सर्व अधिका-यांना गरजू कामगारांचे प्रलंबित अर्जांचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.तरी देखील काही अधिकारी आपला कामचुकारपणा चालूच ठेवून या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.त्यामुळे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज बुधवारी

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच याबाबत काहीच हालचाल होत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात घुसून अधिका-यांना घेराव घालत प्रलंबित कामांबाबत निपटारा होत नसल्याचा चांगलाच जाब विचारला.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी आंदोलकांनी

कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा , प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा ,ञुटी काढलेल्या अर्ज मंजूर करुन पाञ लाभार्थ्यांना योजनेच्या सुविधांचा लाभ द्यावा अशा मागण्यांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास १७ जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिला.या आंदोलनात

भरमा कांबळे ,मदन मुरगुडे ,राजेंद्र निकम ,आनंदा गुरव , ्बापू कांबळे ,कुमार कागले ,राहुल दवडते ,आरंजय पाटील ,विजय कांबळे सदाशिव यादव ,अमीत वडर यांच्यासह बांधकाम कामगार व अन्य क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post