इचलकरंजी नगरपरिषदेकडून रक्कम अदा करण्यास टाळाटाळ : सर्व श्रमिक संघाचा निषेधात्मक कृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोरोना काळात स्वतःसह कुटूंबाच्या जीवाची पर्वा न करता नागरी आरोग्य प्राथमिक केंद्राकडे कर्तव्य बजावलेल्या ६८ कंञाटी कर्मचाऱ्यांना थकीत ८ महिन्याची सुमारे १६ लाख ३२ हजार रुपयांची कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करण्यास इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणा-या कंञाटी आरोग्य कर्मचाऱ्यांवरच आता कोरोना प्रोत्साहन भत्ताअभावी उपासमारीची वेळ आली आहे. यातून प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या अन्यायी वागणुकीमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरच याबाबत लोकशाहीच्या मार्गाने निषेधात्मक कृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार सर्व श्रमिक संघाच्या बैठकीत करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात शासनाबरोबरच प्रशासन , सामाजिक संस्था व संघटनांनी जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला आहे.यामध्ये इचलकरंजी शहरातील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्राकडील ६८ कंञाटी कर्मचाऱ्यांचे देखील मोठे योगदान राहिले आहे.वास्तविक , कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी स्वतःसह कुटूंबाच्या जीवाची पर्वा न करता शासन निर्देशाप्रमाणे अगदी कर्तव्य भावनेनेे नोव्हेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत प्रामाणिकपणे कामकाज पार पाडले आहे.या ९ महिन्याच्या काळातील प्रती कर्मचारी ५ हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा ,अशी मागणी सर्व श्रमिक संघाने नगरपरिषद प्रशासनाने केली होती.परंतू ,याबाबत नगरपरिषद कौन्सिल सभेत ३ हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.असे असूनही प्रशासनाने मागील नोव्हेंबरमध्ये या थकीत प्रोत्साहन भत्तापैकी केवळ १ महिन्याची भत्याची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे.माञ , उर्वरित ८ महिन्याची सुमारे १६ लाख ३२ हजार रुपयांची थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करण्यास नगरपरिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.याबाबत सर्व श्रमिक संघाने आवाज उठवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे मागणीचे निवेदन सादर करत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.परंतू ,या मागणीला बेदखल करत प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल हे कंञाटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सर्व श्रमिक संघाने केला आहे.यामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी हे तांञिक अडचणी सांगून थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करण्यास असमर्थता देखील दाखवत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
वास्तविक , काही महिन्यांपूर्वी सर्व श्रमिक संघाने नागरी आरोग्य केंद्राकडील कंञाटी कर्मचाऱ्यांना थकीत ८ महिन्यांची कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम तात्काळ मिळावी ,या मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगलयांच्याकडे सादर केले होते.यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वाय .आर.साळे यांचे कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत संततीचे लेखी पञ सादर करावे ,असे फर्मान सोडले होते.त्यानुसार सदर संघटनेने त्याचा पाठपुरावा करुन तसे लेखी पञ देखील इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनास सादर केले आहे.असे असूनही प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांनी कंञाटी कर्मचाऱ्यांना थकीत कोरोना प्रोत्साहन भत्याची रक्कम अदा
करण्यास नगरपरिषद प्रशासन असमर्थ असल्याचे सांगून स्वतःची नैतिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असून यासंदर्भात नुकतीच त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कंञाटी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी उलट त्यांनाच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही सर्व श्रमिक संघाने केला आहे.तसेच याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून नागरी आरोग्य केंद्राच्या कंञाटी कर्मचाऱ्यांना थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करुन न्याय देण्याची तात्काळ कार्यवाही करावी ,अन्यथा प्रशासनाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने निषेधात्मक कृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार सर्व श्रमिक संघाच्या बैठकीत करण्यात आला.यावेळी संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार ,संघटक सुनील बारवाडे ,उज्वला बारवाडे , योगिता निऊंगरे , अर्चना तावरे ,सुजाता एडके,प्रियांका कांबळे ,उत्कर्षा कांबळे ,प्रतिक्षा साबळे ,धनश्री भोजकर , धनाजी गायकवाड ,स्वाती देसाई , महेश कोष्टी ,रोहन गवळी ,अर्चना पाटील , सचिन लोले ,इमामहुसेन गवंडी , रविंद्र कांबळे आदींसह पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.