प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी /प्रतिनिधी
येथील श्रीनिवासा एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका डॉ. विजया मोहन यांना झी 24 तास यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या झी 24 तास संचलित शेतकरी परिषद कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेजपाटील व झी 24 तास वाहिनीचे संपादक निलेश खरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
विविध राज्यातून शैक्षणिक क्षेत्रातील घेतलेल्या अनुभवातून,अनुभवलेल्या व शिकलेल्या नवीन आणि आगळ्यावेगळ्या आदर्श अध्ययन-अध्यापन प्रणालीचे उद्देश समोर ठेवून तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मागील 35 वर्षांच्या अविरत कार्याचा आढावा घेवून डॉ. विजया मोहन यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डॉ. मोहन यांची कारकिर्दही नव्या पिढीसमोर आदर्शवत अशीआहे. या पुरस्काराबद्दल श्रीनिवासा एज्युकेशनल सोसायटी संचलित तीन शाळांचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच शहरवासियांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.