प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महाराष्ट्र राज्यसभे साठी कोल्हापूर जिल्हातून सहाव्या जागेवर खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला. तसेच खासदार पियुष गोयल आणि डॉ.अनिल बोंडे विजयी झाले. त्याबद्दल भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृवाखाली काॕ मलाबादे चौकात साखर वाटुन फटाके फोडुन विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कणखर नेतृवामुळे सहाव्या जागेवर खासदार धनंजय महाडिक विजयी झाले. यावेळी अनिल डाळ्या यांनी आपल्या भाषणात म्हणाले की ,२०१९ साली विधानसभेमध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल दिला होता. परंतु शिवसेनेने पाटीत खंजीर खुपसले. महाविकास आघाडी स्थापन करून जनतेच्या आशा आकांक्षा यांना तिलांजली दिली. आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला त्यांच्याच आमदारांनी विजयी केले.तसेच संजय राऊत सांगत होते की माझ्यापेक्षा एक मत संजय पवार यांना जास्त पडेल. पण संजय राऊत यांच्या पेक्षा धनंजय महाडिक यांना एक मत जास्त पडले. त्याचा नैतिक पराभव असून त्यांनी या पराभवाची जबाबदारी घेऊन या सरकारने राजीनामा द्यावा. व मा.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे हि महाराष्ट्रातील जनतेची आशा आकांक्षा आहे असे सांगितले. त्याच बरोबर भाजपा जेष्ठ नेते धोंडीराम जावळे म्हणाले जेव्हा पासून हे तिघाडी सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून या राज्यातल्या जनतेवर, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, व्यापारी उद्योजक यांच्यावर मोठे संकट आलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक विजयी झाले हि सरकारला चपराक आहे. पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी विधानपरिषद व इचलकरंजी महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.
यावेळी पांडुरंग म्हातुकडे, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, विनोद काकांनी, दिपक राशिनकर, राजेंद्र पाटील, किसन शिंदे, सौ.पूनम जाधव, सौ.अश्विनी कुबडगे, सौ.योगिता दाभोळे, आण्णा आवळे, राजराम पवार, उत्तम विभुते, दिपक रावळ, सतीश भस्मे, म्हाळसाकांत कवडे, सागर कचरे, रामसागर पोटे, प्रदिप माळगे, शिवानंद रावळ, सचिन माळी, महेश पाटील, हेमंत वरुटे, शुभम बरगे, राकेश कोतमिरे, अर्जुन मोरे, उमाकांत दाभोळे, भगवान बरागले, अतुल पळसुले, जयवंत पाटील, सुधाकर शेंडगे, सुनील ताटे, दौलत पाटील, गणेश बुगड, प्रदिप कांबळे, राकेश वाझे, दिपक तेलवे, नितीन साळुंखे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.