इचलकरंजी : नुपूर शर्मा, जिदाल यांना अटक करा

इचलकरंजीतील मुस्लिम समाजाची मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मनु फरास : 

इचलकरंजी :  मोहम्मद पैेगबर याच्याबद्दल आक्षेपाऱ्य वक्तव्य करून जातीयतेढ निर्माण करणाच्या एका पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याना अटक करावी अशा मागणीचे निवेदन मुस्लिम शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाशिष्ट मंडळाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.



यावर झालेल्या चर्चेंत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतचे आश्वासन श्री.बलकवडे यांनी शिष्टमंडळास दिले. निवेदनात, इचलकरजी शहरात समस्त हिंद् -मुस्लिम समाज एकोप्याने राहतो. काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी जाणूनबुजून जाती-धर्मोत तेढ् निर्माण व्हावी या उद्देशाने मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीची व खोटी माहिती देत आक्षेपाऱ्य अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दखावल्या गेल्या.आक्षेपार्य वक्तव्यामुळे दोन इचलकरंजीतील मुस्लिम समाज.समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्यासह देशाच्या एकात्मतेला बाधा निर्माण झाली.या अवमानकारक वक्तव्याचा मुस्लिम समाजातून निषेध नोदवला गेला. इचलकरंजी शहरातील सामाजिक एकोपा अबाधित व अखंडीत राहावा म्हणून मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपाऱ्य विधान करणाच्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा,अशी मागणी इचलकरंजीतील समस्त मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे .

 यावेळी निवेदन स्विकारून पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी  नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी गृहविभागास माहिती  पाठविण्यात येईल तसेच भविष्यात अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी अल्पसखयांक वर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी अहमद मुजावर ,  कैश बागवान, पापा मुजावर, आबू पानारी, फरीद मुजावर, मुसा खलिफा , सलीम अत्तार, अकबर मोमीन, कयूमखान, बाळासो मुजावर, मुसा शिर गांवे, आकाशा मुल्ला, समीर शेख, रफिक मुजावर, इम्रान हावेरी, उमर मुल्ला, मेहबूब पठाण आदी उपस्थित होते 





Post a Comment

Previous Post Next Post