श्री साईप्रसाद ग्रुपतर्फे शुक्रवारी विविध सामाजिक कार्यक्रम

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी 

इचलकरंजी येथे श्री साईप्रसाद ग्रुपच्या वतीने दानशूर व्यक्तीमत्व कै.सिताराम महाजन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उद्या शुक्रवारी महेश क्लबमध्ये रक्तदान शिबीर यासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर तसेच दुपारी ४ वाजता कै .सीताराम महाजन यांच्या स्मृती स्तंभचे अनावरण, समाजातील गरीब - गरजूंना धान्य वाटप, दिव्यांग मुलांना खाऊ वाटप व गो शाळेस निधी प्रदान असे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे , असे आवाहन श्री साईप्रसाद ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post