लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

 इचलकरंजी ता. हातकणंगले येथे लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने लोकराजे छत्रपती शाहूमहाराज याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  

सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष  दत्ता मांजरे  (तारदाळकर) उपाध्यक्ष नागेश क्यादगी, दत्तात्रय गोडबोले,अशोक ठोमके. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर लोकक्रांती विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.  तसेच लोकक्रांती विकास आघाडीच्या पदाधिकारीच्या निवडी करण्यात आल्या. 

 


  तसेच लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने जनहित फाऊंडेशन कबनूर संचलित आधार वृद्धाश्रमाला शोभा वसवडे,शबाना शहा,शशिकला मुंदीनमनी.याच्या हस्ते आन्नधान्य देण्यात आले तर आधार व्रध्दाश्रमाच्या अध्यक्षा अरुणा जाधव यांनी लोकक्रांती विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. 

       यावेळी प्रकाश गुरव, मुकुंद शेंडगे,श्रीकांत कांबळे, कल्पना पाटील, अनिता कदम, निहा मुजावर तानाजी शिंदे, दगडू कांबळे व मोठय़ा संख्येने पदाधिकारी  उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post